कुणबी समाजोन्नती संघ राजापूर ग्रामिण समिती कार्यकारिणीची बिनविरोध निवड 

राजापूर (वार्ताहर): कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालूका राजापूर ग्रामीण समितीची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच राजापूर हायस्कुल येथे ग्रामीण समिती अध्यक्ष दिपक बेद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पंचायत समिती विभागावर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

सभेला संघ निरीक्षक म्हणून संघांचे सरचिटणीस अरविंद डाफळे, राजापूर शाखा अध्यक्ष शिवाजी तेरवणकर, संघांचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बावकर, शाखा सचिव अनिल भोवड, राजकीय संघटन समिती अध्यक्ष अशोक वालम, उपाध्यक्ष प्रकाश कातकर, रविकांत भामत, खजिनदार प्रकाश लोळगे, कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, सचिव सौ. मानसी दिवटे, सहसचिव श्रीकांत राघव, माजी संघसरचिटणीस मधुकर तोरस्कर, संघ प्रतिनिधि दीपक नागले, रविंद्र नागरेकर उपस्थीत होते.

या सभेत सन २०२३ ते २०२८ सालाकरिता नविन कार्यकारिणी सदस्यांची पंचायत समिती विभाग निहाय निवड करण्यात आली. त्यामध्ये केळवली विभागातून दीपक बेंद्रे, रमेश सूद, कोंडये विभागातून प्रकाश पुजारी, शांताराम तळवडेकर, कोदवली विभागातून संतोष हातणकर, गोपाळ गोंडाळ, पुरुषोत्तम खांबल, भालावली विभागातून विजय बनबे, धनाजी तांबे, देवाचे गोठणे विभागातून वसंत आंबेलकर, सुरेश राऊत यांची तर साखरी नाटे विभागातून दीपक नागले, सागवे विभागातून राजू कार्शिंगकर, संदेश धुमाळ, अणसुरे विभागातून सत्यवान कणेरी तर ओणी चंद्रकांत जानस्कर, शांताराम शेडेकर ओझर विभागातून प्रकाश मांडवकर, संतोष गितये यांची तसेच पाचल विभागातून अनाजी मासये, जितेंद्र पाटकर यांची तर राजापूर शहर विभागातून प्रकाश (भाऊ) लोळगे, अशोक तांबे यांची तर महिला प्रतिनिधी म्हणून सौ. मानसी दिवटे, सौ. सानिका पुजारी यांची स्वीकृत सदस्य म्हणून प्रकाश कातकर, श्रीकांत राघव यांची तर पत्रकार प्रतिनिधी म्हणून राजेंद्र बाईत, संतोष मोंडे यांची तर कायदेशीर सल्लागार म्हणून अड. प्रविण नागरेकर यांची निवड करण्यात आली.

या सदस्यांमधून ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या सभेत अध्यक्ष निवड केली जाणार आहे.