देवगड
चिरे वाहतूक करणारी १४ ते १६ चाकी वाहने मोठ्या प्रमाणात नांदगाव ते देवगड मार्गावर येत असल्याचे निदर्शनास येतात व या चिरे वाहतुकी मधून क्षमतेपेक्षा अधिक ओव्हर लोड चिरे वाहतूक करण्यात येत आहे हे महसूल प्रशासनाच्या निदर्शनास येताच महसूल प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन देवगड तालुक्यातील नांदगाव देवगड मार्गावरील तोरसोळे फाटा येथे ५ ट्रक मोठी वाहने चिरे वाहतूक करीत असताना अडविली व ती ताब्यात घेतली आहे ही पाचही वाहने देवगड तालुक्यातून कोल्हापूर कर्नाटक च्या दिशेने चिरे वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले असून या संदर्भात देवगडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांनी या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे हे चिरे वाहतूक करणारे ट्रक हे देवगड तहसील कार्यालयाच्या परिसरात उभे करण्यात आले आहेत.
या मोहिमेत देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी श्री चव्हाण श्री पावस्कर तलाठी श्री बोडके आणि तलाठी श्री नाडे या पथकाने ही कार्यवाही केली आहे












