वन्य प्राण्यांकडून झालेल्या शेती, फळबागांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ

आर्थिक सहाय्य देताना प्रजातीनिहाय आणि झाडाचे वयानुसार येणार
रत्नागिरीच्या वन विभागाकडून बाधित शेतकरी, बागायत दारांना नवे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी | प्रतिनिधी
राज्यातील रानडुक्कर, हरीण (सारंग व कुरंग) रानगवा, रोही (नीलगाय), माकड, वानर तसेच वनहत्ती या वन्य प्राण्यांपासून शेतपिकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास या पूर्वीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार नुकसान भरपाईची रक्कम संबंधितांना अदा करण्यात येत होती. मात्र त्यामध्ये आता महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागच्या दि 22 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार फळझाडाचे नुकसान भरपाई रकमेत वाढ करण्यात आली आहे.

प्राण्यांनी फळबागांच्या केलेल्या नुकसान पोटी द्यावयाच्या आर्थिक सहाय्य प्रजातीनिहाय आणि झाडाचे वयानुसार देण्यात येणार आहे. याबाबत आवश्यक असणारे इतर अटी आणि तरतुदी यापूर्वी वरील शासन निर्णयामधील लागू राहणार आहेत. 22 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांच्यामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की, ज्या शेतकऱ्यांच्या फळबागांचा नुकसान झालंय त्यांनी सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने नुकसानी बाबत अर्थसाह्य मिळण्याबाबत अर्ज त्यांच्या नजीकच्या वनाधिकारी यांच्या कार्यालयाकडे जमा करावेत. जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निर्णयातील अटी व तरतुदीनुसार सदर योजनेचा लाभ घेता येईल.

संबंधित GR

202309261734308019