पडेल आणि उंबर्डे या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा नियोजन निधीतून २ रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत. याचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सामान्य प्रशासन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली देवगड मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आज लोकार्पण झाले. या दोन्ही रुग्णवाहिका आजपासून रुग्णसेवेसाठी आरोग्य यंत्रणेत दाखल झाल्या आहे
Home ताज्या घडामोडी पडेल आणि उंबर्डे आरोग्य केंद्रांसाठी २ रुग्णवाहिका…नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण












