खोटले येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा उत्साहात संपन्न!

​मसुरे | झुंजार पेडणेकर
श्री स्वामी समर्थ धार्मिक आणि सामाजिक न्यास, खोटले (प्रस्तावित) यांच्या वतीने ‘श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यनिमित्त स्वामी समर्थ मूर्ती सभोवताली फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. या निमित्त दिवसभर विविध धार्मिक विधी, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

​पहाटे काकड आरती आणि नित्योपासना, श्री. विजय परब (खोटले) यांच्याकडून हरिपाठ सादर झाला . सकाळी लघुरुद्र आणि स्वामींची अलंकार पूजा, श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली . दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, दुपारी सुवासिनींसाठी कुंकूमार्चन सोहळा झाला.

‘मोफत आरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले होते . आरोग्य शिबीर मध्ये तपासणी, औषधे, तसेच चष्मा विनामूल्य आहे.

या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला ‘महापालखी सोहळा’ सायंकाळी संपन्न झाला. यामध्ये जिल्ह्यातील नामवंत ढोलपथके, फुगडी नृत्य, चित्ररथ आणि दिंड्यांचा सहभाग झाले होते .

संध्याकाळी कौतुक समारंभ व कलाविष्कार सादर झाले.
रात्री श्री सातेरी पुरांवतरी भजन मंडळ (कोनाळा-दोडामार्ग) यांचे भजन,रात्री श्री गजानन प्रा. भजन मंडळ (पुरळ, देवगड) आणि प्रसिद्ध गायिका सौ. साची मुळम यांचा गायनाचा कार्यक्रम झाला . रात्री जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ (आरोस, सावंतवाडी) निर्मित ‘शिव मंगलागौरी’ या भव्य दशावतार नाटक.त्या नंतर पहाटे पर्यंत नामस्मरण झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. कार्यक्रम यशस्वीते बद्दल श्री स्वामी समर्थ उत्सव समिती अध्यक्ष तथा मठाधिपती श्री गणेश घाडीगावकर यांनी आभार मानले.