१५० कुटुंबीयांचे राबले हात,एकोप्याचे निर्माण झाले फलित
सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी घेतला पुढाकार
देवगड – महाळूंगे तालुका देवगड येथील महाळूंगे गावातील देवळेकरवाडी मधील देवळेकर,नवले,तोरसकर, आयीर,परब, पाळेकर अशी जवळपास १५० कुटुंबीय राहतात हे दरवर्षी गणेश उत्सव उत्साहात साजरा करतात परंतु बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी यांना विसर्जन घाट व पाण्यात उतरण्यासाठी रस्त्ता नव्हता याबाबत ग्रामपंचायत मधून यावर्षी काही निधी उपलब्ध होऊ शकणार नाही समजल्यावर सरपंच संदीप देवळेकर,सदस्य सुभाष नवले,साक्षी तोरसकर व श्रावणी देवळेकर यांनी पुढाकार घेवून सर्व वाडीतील ग्रामस्थांना प्रोहसहन देवून आपण श्रमदान करून हा घाट बांधूया अनेक मदतीचे हात पुढे येतील असे आवाहन केले आणि खरोखरच पाच दिवस दररोज ६०/६५ लोकांनी एकत्र येवून हे आवाहन पूर्ण केले,यावर्षी ३० गणपतींचे विसर्जन पांच दिवसांनी या घाटावरूनच करण्यात आले विसर्जन नंतर अनेकांनी या घाट निर्माण बद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला,नेहमीच शासनावर अवलंबून न राहता संघटित शक्ती अनेक कामे लीलया पारपाडू शकतात याचे हे उदाहरण आहे.












