ऑफिसमधून लॅपटॉप घेऊन पसार झालेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरातील छत्रपतीनगर येथील एका ऑफीसमधून 50 हजार रुपयांचा लॅपटॉप लांबवल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते शनिवार 23 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वा.कालावधीत घडली आहे.

अक्षय चौगुले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात सुधीर काशिनाथ सुनेकर यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,त्यांचे छत्रपतीनगर येथील कारेकर निवास येथे ऑफीस आहे.संशयिताने या आठ दिवसांच्या कालावधीत त्यांचा एचपी कंपनीचा लॅपटॉप आणि माउस चोरुन नेला.याप्रकरणी अक्षय चौगुले विरोधात भादंवि कायदा कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.