वाटद खंडाळा येथे घरात सापडला प्रौढाचा कुजलेला मृतदेह

dead

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथील घरात प्रौढाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला.याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.ही घटना मंगळवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा.सुमारास उघडकीस आली.

अविनाश शिवराम निमकर (53,रा.वाटद खंडाळा,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.याबाबत घरमालक उदय रानडे यांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली.त्यानुसार,अविनाश निमकर त्यांच्याकडे भाड्याने रहात असून याला दारुचे व्यसन होते.मंगळवारी सकाळी उदय रानडे यांना आपल्या घरात काहीतरी कुजल्याचा वास येउ लागल्याने त्यांनी आजुबाजुच्या लोकांना बोलावून अविनाश रहात असलेल्या रुममचे दोन्ही दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला परंतू ते आतून बंद होते.म्हणून त्यांनी किचनजवळी खिडकीचे झडप उघडून पाहिले असता त्यांना अविनाशचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला.याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.