रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील मालगुंड येथे दारु पिण्याचा परवाना नसताना मद्यप्राशन करणार्या दोघांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई मंगळवार 26 सप्टेंबर रोजी सयंकाळी 6 ते 7.30 वा.कालावधीत करण्यात आली.
निकेत अनंत डोर्लेकर आणि अक्षय अशोक डोर्लेकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.मंगळवारी सायंकाळी जयगड पोलिस मालगुंड परिसरात गस्त घालत असताना त्यांना गायवाडी बिच जवळ आणि उंडीचा पर्या या दोन ठिकाणी संशयित हे दारुचा परवाना नसतानाही दारु पित असताना मिळून आले होते.त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











