रत्नागिरी ः प्रतिनिधी : दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मित्रावर कोयतीन सपासप वार केले.याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सोमवार 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वा.कुवारबाव येथील प्रसाद बार समोर घडली. पप्या असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,सोमवारी ते प्रसाद बारमधून दारु पिउन बाहेर येत असताना पप्या त्यांच्या समोर आला.त्याने फिर्यादीकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले.तेव्हा फिर्यादी यांनी तुला रोजरोज कोठून पैसे आणून देउ आज माझ्याकडे पैसे नाहीत.तसेच तुझ्या बापाने माझ्याकडे पैसे देउन ठेवलेले नाहीत असे पप्याला सांगितले.याचा राग आल्याने पप्याने बाजुच्या मनी लॉटरीच्या दुकानातून कोयता आणून फिर्यादीच्या डोक्यावर वार केला.त्यानंतर दुसरा वार फिर्यादीने हाताने अडवल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली आहे.याप्रकरणी पप्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.











