सागरतीर्थ समुद्र किनारी कलाकार रविराज चिपकर यांनी गणपतीला निरोप देणारे साकारलेले वाळूशिल्प ठरत आहे लक्षवेधी

वेंगुर्ले : दाजी नाईक :पुढच्या वर्षी लवकर या…अस लिहीत आरवली सोनसुरे येथील प्रसिद्ध कलाकार रविराज चिपकर यांनी सागरतीर्थ समुद्र किनारी गणपतीला भावपुर्ण निरोप देताना त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे साकारलेले वाळूशिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कोकणामध्ये गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण. घरोघरी हा सण साजरा केला जातो. भक्त मंडळी आपल्या घरी यथोचित दीड, पाच, सात, नऊ, अकरा दिवस गणपतीची मनोभावे पूजाआर्चा करतात आणि नंतर या गणरायाला निरोप देण्यात येतो. यावर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. त्या दिवसा पासून आज अकरा दिवसा पर्यंत भाविकांनी त्याची पूजा केली, आणि आज निरोप देण्याची वेळ आली.

आज संध्याकाळी भाविक जड अंतःकरणाने या बाप्पाला निरोप देणार आहेत. त्याच धर्तीवर प्रसिध्द वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विसर्जनाला घेऊन जाणाऱ्या गणपतीचे वाळू शिल्प उभारले आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त विनवणीही केली आहे.