रेखा बागुल यांना यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार-२०२३ जाहीर.!

दापोली प्रतिनिधी :दापोली तालुक्यातील जालगाव येथील रेखा रविंद्र बागुल यांना यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार जाहीर झाला आहे. रेखा बागुल ह्या समाजातील दुर्लक्षित घटकातील मुले आणि व्यक्तींसाठी काम करित आहेत.आनंद फाऊंडेशन संचालित बहुकविकलांग गतिमंद मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र दापोली च्या कार्याध्यक्ष, स्नेहदीप कर्णबधीर विद्यालयाच्या संचालिका, दातार व्रूद्धाश्रमाच्या संचालिका,तसेच अनेक आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या साठी करित असलेल्या सेवाकार्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई पुरस्कृत यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार २०२३ रेखा रविंद्र बागुल यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दि. ८ ॲाक्टोबर रोजी मुंबई येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांचे हस्ते प्रदान करणेत येणार आहे.