प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात फळे व फळभाज्या यांचे प्रदर्शन

Google search engine
Google search engine

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, या उद्देशाने शनिवार दि. ७ जानेवारी २०२३ रोजी प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात फळे व फळभाज्यांचे प्रदर्शन इयत्ता दुसरीच्या विदयार्थ्यांच्या सहभागातून शाळेत भरवण्यात आले.यामधे शेंगभाज्या, कंदभाज्या,ठराविक हंगामात मिळणारी फळे, बारमाही मिळणारी फळे या सर्वांचा समावेश होता.

यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी फळे खाण्याचे फायदे , भाज्यांचे आहारातील महत्त्व, त्यापासून मिळणारी जीवनसत्त्वे इ. महत्त्वपूर्ण माहिती सांगितलीसौ सिद्धी ठसाळे यांनी फळे व फळभाज्यांची ओळख व उपयोगप्रश्नावलीच्या आधारे विद्यार्थी प्रतिसादातून दिली . विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दाखवला .शाळेच्या मुख्याध्यापिकाश्रीम. संगिता नाईक यांनी फळे व भाज्या यांचे आरोग्याच्यादृष्टीने महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या समन्वयातून हे प्रदर्शन उत्साहात पार पडले.