मदतीचा हात देणाऱ्या ५१ जणांचा कीर्तनसंध्या महोत्सवात सन्मान

रत्नागिरी : करोनाच्या काळात आणि त्यानंतर उद्भवलेल्या एका वेगळ्या परिस्थितीत गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या ५१ जणांचा कीर्तनसंध्या महोत्सवात सन्मान करण्यात आला. रत्नागिरीत पाच दिवसांच्या कीर्तनसंध्या महोत्सव सुरू आहे. महोत्सवात तिसऱ्या दिवशी मदतीचा हात देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. करोनाच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक संस्थांनी एकत्र येऊन हेल्पिंग हँड नावाची एक अदृश्य साखळी निर्माण केली. या साखळीने हर तऱ्हेची मदत अनेक गरजू लोकांना केली. अनेकांची भोजनाची व्यवस्था केली. अनेकांची निवाऱ्याची व्यवस्था केली. अनेकांना रुग्णालयात घेऊन जाणे, त्यांना पुन्हा घरी पोहोचविणे, औषधे पोहोचविणे, लहान मुलांना दूध उपलब्ध करून देणे अशी अनेक कामे या हेल्पिंग हॅण्डने केली. असे काम करणाऱ्या ५१ समाजसेवकांचा सन्मान कीर्तनसंध्या महोत्सवामध्ये हभप चारुदत्त बुवा आफळे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यांची नावे अशी – आदेश आग्रे, सुबहान तांबोळी, अनिरुद्ध खामकर, जकी खान, मुकेश गुंदेचा, सौरभ मुळ्ये, रूपेश सावंत, गणेश धुरी, राजेश नेने, वल्लभ वणजू, नंदकुमार चव्हाण, भूषण बर्वे, कौस्तुभ सावंत, महेश गर्दे, सूर्यकांत कटारिया, चेतन नवरंगे, खोपेकर, शैलेश मुकादम, स्वप्नील साळवी, मयूरेश मडके, तन्मय सावंत, सिद्धेश धुळप, मोहन बापट, धीरज पाटकर, योगेश मुकादम, सुहास ठाकूरदेसार्ड, शकील गवाणकर, मन्सूर काझी, अमोल डोंगरे, मुसा काझी, रफिक विजापुरी, नीलेश मलुष्टे, नित्यानंद भुते, सुहेल मुकादम, राकेश नलावडे, राजेश मलुष्टे, अमोल श्रीनाथ, सौरभ मलुष्टे, मोरेश्‍वर जोशी, अवधूत जोशी, सचिन शिंदे, नीलेश निवळकर, गौतम बाष्टे, दीपेश साळवी, सचिन केसरकर,
कुणाल शेरे, संजय वैशंपायन, अमोल शिंदे, नैनेश कामेरकर, जयंतीलाल जैन, कुंतल खातू आणि कीर्तनसंध्याचे अवधूत जोशी. या सर्वांना सन्मानपत्र देण्यात आले.

अशा लोकांचा सन्मान करणे भाग्याचे आहे. कीर्तनसंध्या परिवारामुळे हे भाग्य लाभले, असे असे उद्गार आफळे बुवांनी यावेळी काढले. ते म्हणाले, यापूर्वी सफाई कामगारांना हातमोजे देणे, रणांगणावर जिवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचा सत्कार, अपंगांचा सत्कार असे वेगवेगळे उपक्रम कीर्तनसंध्या परिवाराने राबविले आहेत. सलग बारा वर्षे भारतीय इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, म्हणून अत्यंत भव्य स्वरूपात कीर्तनसंध्या महोत्सव आयोजित केला जात आहे. आपले छोटे छोटे उद्योग, नोकऱ्या सांभाळून परिवारातील मंडळी एकत्र येऊन हे काम करत आहेत. वास्तविक लिम्का बुकमध्ये नोंद करण्यासारखा हा उपक्रम आहे, असे गौरवोद्गारही बुवांनी यावेळी काढले.