रत्नागिरी | प्रतिनिधी :शहर आणि परिसरात तसंच जिल्हाभरामध्ये मुसळधार पाऊस रात्रभर पडत असून सर्वत्र जोरदार वारे सुद्धा सुटले आहेत पावसाचा हा जोर रविवारी दिवसभर राहण्याची शक्यता वेधशाळा कडून व्यक्त करण्यात आली आहे अरबी समुद्रा तयार झालेल्या चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचा हवामान खात्याकडून सांगितलं जात आहे दरम्यान येथे तीन ते चार तासांमध्ये रत्नागिरीसह मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली असून हा संदेश सकाळी 10 वाजता भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे










