लवकरच लागणार स्पर्धेचा निकाल
रत्नागिरी | प्रतिनिधी : प्रहार Digital, दै. प्रहार ने प्रथमच मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऑनलाईन घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लवकरच या स्पर्धेचा निकाल घोषित केला जाणार आहे.
प्रहार Digital, दै. प्रहार, मातृभूमी प्रतिष्ठानसह बालाजी सेक्युरिटी सर्व्हिसेस, नृत्यार्पण नृत्य अकादमी आणि नंदाई digital मार्केटिंग यांच्यासह या स्पर्धेचे रत्नागिरी जिल्ह्यासाठी आयोजन करण्यात आले होते. त्याला केवळ रत्नागिरीच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा अनेकांनी एंट्री करून स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. ऐतिहासिक, सामाजिक, देशभक्तीपर, पौराणिक विषयच्या देखव्यातून जिल्ह्यातील गणेशभक्तांच्या कल्पनशक्तीचा प्रत्यय यातून आयोजकांना आला. यातील अनेक व्हिडीओ प्रहार Digital entertainment channel वर तसेचं प्रहार Digital च्या फेसबुक पेजवर सुद्धा publish केले.
आत्ता स्पर्धकांना प्रतीक्षा निकालाची असून लवकरात लवकर बक्षीस घोषित करून शानदार कार्यक्रमात त्याचे वितरण केले जाणार आहे. या निकालाची घोषणा प्रहार Digital आणि दै. प्रहार वरून लवकरच केली जाणार आहे.











