रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वेब साईटचे उद्घाटन चिपळूण तालुक्यातील- डेरवण येथे राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेस प्रारंभ…..

रत्नागिरी जिल्हा एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलन डेरवण येथे आयोजित करण्यात आलेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य जुनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेदरम्यान रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या अधिकृत वेब साईटचे उद्घाटन आणि स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आले….

एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलन डेरवण येथे शनिवार दि..३० सप्टेंबर पासून ३७.व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रारंभ झाला १२००, खेळाडू प्रशिक्षक,पालक, पंच असे २०००, अधिकजण उपस्थित आहेत….ratnagiriathletieg in- या रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या वेब साईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य अथलेटिक्स असोसिएशनचे सरचिटणीस सतीश उचल, उपाध्यक्ष संजय पाटील, राजू प्याटी, संकुलनाचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, संघटनेचे सचिव संदीप तावडे आदी मान्यवर उपस्थित होते….

यावेळी बोलताना बाळासाहेब कदम यांनी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीच ट्रस्टचे आंतरराष्ट्रीय दर्जेचे क्रीडा सुविधा अगदी तळागाळातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी व्यक्त केली. याच वेळी रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनची वेब साईट तयार केल्याबद्दल संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि तांत्रिक समितीचे सदस्य यांचे कौतुक केले….

दोन दिवस चालणाऱ्या या राज्य स्पर्धेतून १४ व १६.. वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. हा संघ कोइम्बतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे….

डेरवण येथे सुर झालेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे आणि जिल्हा संघटनेच्या वेब साईटच्या उद्घाटनासाची घोषणा करताना रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनची अध्यक्ष बाळासाहेब कदम, सोबत सतीश उचिल, संजय पाटील, राजा प्याटी, श्रीकांत पराडकर, संदीप तावडे आदी मान्यवर उपस्थित होते