जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अनया वणजुला रौप्यपदक

रत्नागिरी : चिपळूण येथील शाहनूर तायक्वांदो अॅकॅडमी आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या अनया अभिज्ञ वणजु हिने ४१ किलोखालील वजनी गटात रौप्यपदक पटकावले. ही स्पर्धा चिपळूण येथे झाली. अनयाने कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्झकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. तिच्या यशामुळे तिच्या पालकांबरोबर प्रशिक्षक व शाळेचाही गौरव झाला आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.