मंडणगड ( प्रतिनिधी )येथील मंडणगड तालुका विकास मंडळ F 1428 मुंबई, संचलित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी, शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत नेहमीप्रमाणे आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धा लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव, या ठिकाणी दिनांक 29 व 30 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड, या विद्यालयातील 17 वर्षे वयोगट मुले-मुली दोन्ही संघ प्रथम क्रमांक, 14 वर्षे मुले व मुली दोन्ही संघ द्वितीय क्रमांक, 19 वर्षे मुले प्रथम क्रमांक ,19 वर्षे मुली द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तरी संघाचे प्रशिक्षक श्री. मनोज चव्हाण व श्री. संजय अवेरे यांनी संघाची उत्तम तयारी करून घेतली होती. त्याला विद्यालयातील इतर शिक्षकांचे ही सहकार्य लाभले होते. सर्व विजयी संघ, व त्या संघांचे मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका यांचे अभिनंदन संस्था व शाळेच्या वतीने, मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी केले आहे.विद्यालयाच्या या उत्तुंग यशाबद्दल, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.











