खेड : भरणे नाका येथील पाणी कमी झाले असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. खेड शहरातील रस्त्यावरील पाणी ओसरले आहेअसे प्रशासनाने कळवले आहे.
माध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. खेड मध्ये भरणे नाका येथे सकाळी पाणी भरले होते.
त्याचा परिणाम वाहतूकीवर झाला होता.
मात्र संध्याकाळी हे पाणी ओसरून वाहतूक पूर्ववत झाली आहे.











