मोडकाआगर l वार्ताहर :गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे जानवळेफाटा येथे मर्याम प्लाझा पहिला मजला, मनसे संपर्क कार्यालय गुहागर (शृंगारतळी) च्या वरती सावंत फिटनेस जिमचे उद्घाटन तालुक्यातील नामवंत डॉ. राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता गुलाम तांडेल, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच असीम साल्हे , सावंत फिटनेस जिमचे मालक योगेश सावंत, सचिन पवार, गणेश मोरे, अमित सावंत, सचिन पांडुरंग पवार, अमित सावंत, नितीन सावंत व सावंत कुटुंबिय व मित्रपरिवार उपस्थित होते. सावंत फिटनेस जिम एअर कंडीशन असून अत्याधुनिक नवनवीन मशीन असून तज्ञ ट्रेनर सहित सावंत फिटनेस जीमला सुरुवात झाली असून सुरुवातीला प्रवेशासाठी विशेष सवलत असल्याची माहीती योगेश सावंत यांनी दिली.












