लांजा (प्रतिनिधी) तालुका विधी सेवा समिती लांजाच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबिर ग्रामपंचायत झापडे येथे संपन्न झाले. या कायदेविषयक जनजागृती शिबिरामध्ये तालुका विधी सेवा समितीचे पॅनेल विधिज्ञ मंदार बंडबे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते .याप्रसंगी मंदार बंडबे यांनी उपस्थित ग्रामस्थांना कायद्याविषयी थोडक्यात ओळख करून दिली. ज्येष्ठ नागरिक, मुले व महिला यांच्यासाठी असलेल्या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी असलेल्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी झापडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कुष्टे ,ग्रामसेविका, पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष आणि झापडे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












