डॉ. क्षितिज समीर जोशी यांचे राष्ट्रीय दंतवैद्यक परिषदेत सादर केलेल्या केसला जुरीअवॉर्डमधे तृतीय पुरस्कार

रत्नागिरी : रत्नागिरीचे प्रतिथयश वैद्यकीय तज्ञ डॉ. समीर जोशी आणि डॉ. रत्ना जोशी यांचा मुलगा डॉ. क्षितिज ह्याने INDIAN ENDODONTICS SOCIETY च्या ३० सप्टेंबर २०२३रोजी भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय दंत वैद्यक परिषदेमध्ये सादर केलेल्या केसला जुरी अवॉर्ड मधे तृतीय पुरस्कार प्राप्त झाला.

हा पुरस्कार त्याला जपान चे प्राध्यापक डॉ. योशी टेराऊची आणि इटलीचे प्रोफेसर डॉ. अर्नाल्डो कॅस्तेलुसी ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ह्या परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून पहिल्या दहा केसेस मधे त्याच्या केसची निवड करण्यात आली होती. त्यातून त्याने केलेल्या केस सादरीकरणाला तृतीय क्रमांकाचा हा महत्वाचा पुरस्कार प्राप्त झाला. विशेष म्हणजे त्याने परीक्षकांसमोर सादर केलेल्या केसची आतापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद दंत साहित्यात सापडलेली नाही. ऑनलाईन परीक्षणताही त्याने तृतीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल डॉ. क्षितिज समीर जोशी यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.