दिवाळीसाठी शासनाकडून जनतेला भेट 

वाचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरुपात 

मुंबई :दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश ( अन्न व नागरी पुरवठा) विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ ( ऊर्जा विभाग)

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ (अल्पसंख्याक विकास विभाग) नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी (विधी व न्याय) इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा ( गृहनिर्माण)