राजापुरात गणेशविसर्जन मिरवणूकांमध्ये माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे यांच्याकडून पुष्पवृष्टी

उपक्रमाचे होतेय कौतुक

राजापूर l प्रतिनिधी : राजापूर शहरात गणेशविसर्जन मिरवणूकांप्रसंगी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे यांनी पुष्पवृष्टी करत गणरायाला निरोप देत गणेशभक्तांचा उत्साह वाढविला. राजापूरात दरवर्षी गणेशविसर्जन मिरवणूकांसाठी न. प. प्रशासन, पोलीस प्रशासन सुयोग्य असे नियोजन करते. तर राजापूरचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे हे दरवर्षी शहरातील बहुतांश घरगुती व सार्वजनिक गणपती मंडळांना भेट देत त्यांना शुभेच्छा देतात. तर गणपती विसर्जन मिरवणुक प्रसंगी गणेशविसर्जन घाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या गणपती व गणेशभक्तांवर पुष्पवृष्टी करतात.

यावर्षीही पाच दिवसांच्या, सात दिवसांच्या व दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करण्यात आलेल्या गणपतींच्या मिरवणूकीत बाप्पावर तसेच गणेशभक्तांवर पुष्पवृष्टी करत अ‍ॅड. जमिर खलिफे यांनी गणरायाला निरोप दिला व गणेशभक्तांचा उत्साह वाढविला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.