विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

वैभववाडी आयटीआय चा स्तुत्य उपक्रम 

वैभववाडी l प्रतिनिधी :    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा राज्याभिषेक दिनानिमित्त व महात्मा गांधी यांची 154 वी जयंती निमित्त गड किल्ले संवर्धन व स्वच्छता अभियानांतर्गत आय. टी. आय. वैभववाडी यांच्या वतीने विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी संस्थेचे प्राचार्य, श्री. एन. डी. पिंडकुरवार, निदेशक श्री पी. डी. गुरखे, श्री.अमोल राणे, श्री.सचिन कोलगांवकर, कर्मचारी श्री मन्नत स्वामी व संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी तसेच आय.टी.आय. देवगड संस्थेचे निदेशक श्री. धुरी, श्री. मटकर व त्या संस्थेचे सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

स्वच्छता अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांना विजयदुर्ग किल्लाचे संवर्धन व स्वच्छता करून अभिवादन करण्यात आले. विजयदुर्ग सरपंच श्री .रियाज ए.रज्जाक काझी व ग्रामसेवक श्री.ए. डी. वारे , ग्रामपंचायत सदस्य तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष श्री. कोयंडे, श्री.पाटील यांनी ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याचा सविस्तर इतिहास सांगून सर्व गोष्टींना उजाळा दिला. शिवगर्जनाचा जयघोष करुन किल्ल्यावरील संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते .