आबलोली (वार्ताहर )अज्ञान , अस्वच्छता, अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाला त्याचा,मनाचा आणि बुध्दीचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन कीर्तना सारखे प्रभावी माध्यम वापरुन समाज सुधारणेचे महान कार्य करून पैसा शिक्षणावर खर्च करा रे मुलांना मंदिरात नाही शाळेत पाठवा रे मुले शिकली पाहिजेत तरच भविष्यकाळ उज्ज्वल आहे असा ज्ञानरुपी मौलिक संदेश देणारे स्वच्छतेचे महामेरु संत गाडगेबाबा यांची जयंती गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, दिपप्रज्वलन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी नेटके, ग्रामसेवक श्री.बी.बी.सुर्यवंशी, उपसरपंच श्री.अक्षय पागडे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.विद्याधर कदम उर्फ विजू आप्पा कदम, श्री.यशवंत पागडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री.सचिन कारेकर,माजी सरपंच श्री.प्रमेय आर्यमाने, ग्रामपंचायत सदस्य श्री.ऋषीकेश बाईत,संजय कदम, सेवानिवृत्त पोलिस श्री.सोनू शिवराम पागडे, मुख्याध्यापक श्री.राजदत्त कदम, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.पुजा कारेकर,श्री.उदय सुर्वे, श्री.दिनेश शिंदे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री.योगेश भोसले, श्री.राकेश पालशेतकर आदी.मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला वंदन केले , अभिवादन केले












