गणेश विसर्जन ठिकाणी स्वखर्चातून सिमेंट काँक्रिट प्लॅटफॉर्म उभारणार

दत्ता सामंत यांचा नागरिकांना शब्द ; रेवतळे सागरी महामार्ग आडारी सातेरी मांड जाणाऱ्या पूल ठिकाणी होणार व्यवस्था

मालवण | प्रतिनिधी : रेवतळे सागरी महामार्ग आडारी सातेरी मांड जाणाऱ्या पूल ठिकाणी गणेश विसर्जन वेळी येणाऱ्या समस्या लक्षात घेता याठिकाणी स्वखर्चातून सिमेंट काँक्रिट प्लॅटफॉर्म उभारणी करणार असल्याचे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत माहिती माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली.

सदा मडये, समीर मडये, विद्याधर मडये, अमेय बादेकर, निनाद बादेकर या नागरिकांनी या ठिकाणी गणेश विसर्जन दरम्यान येणाऱ्या समस्या दुरु करून व्यवस्था उभरावी अशी मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान भाविकांना गणेश विसर्जन सुलभ व्हावे यासाठी या ठिकाणी सिमेंट काँक्रिट पद्धतीने प्लॅटफॉर्म उभारणी करून देण्याचे दत्ता सामंत यांनी नागरिकांना आश्वासित केले. प्लॅटफॉर्म उभारणी नंतर पुढील वर्षी गणपती बाप्पांचे विसर्जन नागरिकांना याठिकाणी करणे सुलभ होणार आहे. असे दीपक पाटकर यांनी माहिती देताना सांगितले.

यावेळी दत्ता सामंत, माजी नगरसेवक दीपक पाटकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, भाजप युवा मोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, पंकज पेडणेकर यांसह मुन्ना फाटक, विष्णू भोजने, राजन भोजने, विजय फाटक, सचिन मडये, सिद्धेश मडये, आकाश मडये, गौरव सारंग, प्रणय माळकर, बाबु टेमकर, लीलाधर मडये, संकेत वाईरकर, सिद्धेश पाटकर, संदीप मडये, राजा मांजरेकर, नितीन हडकर, सचिन हडकर, शुभम लुडबे, बाबु शिंदे आदी उपस्थित होते.