आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नामुळे देवगड ग्रामीण रुग्णालयात आणखी तीन अधिपरिचारिकांची नेमणूक

आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नामुळे देवगड ग्रामीण रुग्णालयात आणखी तीन अधिपरिचारिकां ची नेमणूक

जिल्हा परिषदेतून आज अधिपरिचारिकांचे समुपदेशन आयोजित करण्यात आले होते यातून देवगड ग्रामीण रुग्णालयाला आणखी तीन अधिपरिचारिकांची नेमणूक करण्यात आली .आमदार नितेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे या अधिपरिचारिकां देवगड ग्रामीण रुग्णालयाला मिळू शकल्या आहेत

यामुळे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर एकूण चार अधिपरिचारिकां देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये हजर झाले आहेत

देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये कर्मचारी कमी असल्याने तेथील अधिपरिचारिकांनी आपण काम बंद आंदोलन करत असल्याची नोटीस प्रशासनाला दिली होती तेथील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रघुनाथ जोशी यांनीही आपणाला या रुग्णालयात सेवा देणे शक्य नसल्याचे म्हटले होते मात्र तातडीने याबाबतची दखल आमदार नितेश राणे यांनी घेऊन एका अधिपरीचारिकेची प्रतिनियुक्ती करण्यास प्रशासनाला भाग पाडले व उर्वरित अधिपरिचारिका आज देण्यात आल्या तेथील कर्मचारी वर्गाने आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत