‘आस्था’मध्ये शनिवारी श्रवणदोष असणाऱ्या बालकांसाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी व डॉ.एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई मुंबई या यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि 07/10/2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 यावेळेत जन्मतः श्रवणदोष असणाऱ्या, ऐकण्याचा त्रास असलेल्या किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या , बोलतांना अडचण येणाऱ्या अशा सर्व बालकांसाठी व त्यांच्या पालकांसाठी मोफत मार्गदर्शक शिबिराचे आयोजन “आस्था थेरेपी सेंटर ” छत्रपती शिवाजी स्टेडियम मारुती मंदिर रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.या शिबिरात डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई मुंबईच्या प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ. काश्मीरा चव्हाण या लहान मुलांची तपासणी करणार आहेत. तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या संदर्भ सेवा व त्यांच्या पालकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. ऑडिओलॉजिस्ट श्रीम. प्राजक्ता भोगटे या देखील मुलांच्या बोलण्या संदर्भातील समस्यांबाबत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराला येतांना पालकांनी मुलांच्या पूर्व तपासणी केलेले रिपोर्ट सोबत आणावेत.

दि.08/10/2023 रविवार रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील श्रवणबाधित पालकांच्या बालकांची मोफत श्रवण (हियरिंग )स्क्रिनिंग आयोजित केली आहे. जेणेकरून आई,वडील कर्णबधीर असल्याने बालकांमध्ये देखील दोष असण्याची शक्यता जास्त असते.असे असल्यास लवकर निदान झाल्यास त्यांना देखील उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधां देता येईल, उपचारानंतर ही बालके मुख्य प्रवाहात यावी यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे असे याप्रसंगी आस्था दिव्यांग हेल्पलाईनचे प्रमुख समन्वयक व स्पीच थेरपीस्ट श्री. संकेत चाळके यांनी सांगितले. जिल्ह्यातील बालरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी त्यांच्या संपर्कातील अशा बालकांच्या पालकांना या शिबिराची माहिती द्यावी जेणेकरून कोणी सुटणार नाही असे आवाहन आस्थाच्या सचिव व प्रकल्प संचालक श्रीम. सुरेखा पाथरे यांनी केले आहे. या शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे तरी पालकांनी 10 ते 6 या वेळत कॉल करून 9833357506 / 9834440200 या नंबर वर नोंदणी करावी.