चिपळूण (वार्ताहर) : कोल्हापूर चित्पावन संघ आणि पंचरत्न वधू-वर सूचक मंडळ कोल्हापूर यांनी संयुक्तपणे एक वधुवर पुस्तिका प्रसिध्द केली आहे. या पुस्तिकेत २६८ वर आणि १३९ वधू याची माहिती प्रसिद्ध केली आहे. ही पुस्तिका चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघात दि. २१ नोव्हेंबरपासून सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत मिळेल.
या पुस्तिकेची किंमत २०० रूपये एवढी आहे. ज्या वधूवरांच्या पालकांना ही पुस्तिका हवी असेल त्यांनी चिपळूण ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण श्री देव वीरेश्वर मंदिर परिसर मध्यवर्ती बसस्थानकामागे येथे उपलब्ध असेल. पुस्तिका विकत मिळेल नुसती पहायला मिळणार नाही.











