भाजपाचे राजापूर तालुका निरीक्षक विजय कुरूप यांची पदाधिकाऱ्यांच्या भेट आणि चर्चा

लांजा (प्रतिनिधी) भाजपाचे राजापूर तालुका निरीक्षक तथा जिल्हा कार्यकारणी निमंत्रित सदस्य विजय कुरुप यांनी नुकताच राजापूर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी घेऊन त्यांना पक्ष संघटनावाढी संदर्भात मार्गदर्शन केले.

लांजा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष असलेले विजय कुरूप यांच्यावर राजापूर तालुका भाजपाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा भाजपा कार्यकांनी निमंत्रित सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. याबाबत विजय कुरूप यांनी नुकताच राजापूर दौरा केला.

राजापूर तालुका पूर्व विभाग मंडल अध्यक्ष भास्कर सुतार यांची पाचल येथे भेट घेतली.लगेचच पाचल येथील बुथ क्रमांक 134,135,136,137 पालक समीर खानविलकर, मुकेश जाधव यांच्या समवेत चर्चा करून सर्व आढावा घेतला.बुथ प्रमुख इतर पदाधिकारी नियुक्ती करण्या संदर्भात सविस्तर चर्चा करुन मार्गदर्शन केले. हरळ येथील बुथ क्रमांक 138 पालक सचिन रामचंद्र साळवी, अंबाजी गुरव यांच्या समवेत चर्चा करून मार्गदर्शन केले. करक येथील बुथ क्रमांक 185,186,187 चे पालक प्रदीप अनंत गांधी यांचे समवेत चर्चा करून मार्गदर्शन केले.

पाचल वरुन परत येत असताना ओणी या ठिकाणी भाजपा जिल्हा कार्यकारणी निमंत्रित सदस्य व जेष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत लिंगायत, जिल्हा कार्यकारणी सदस्य व सौंदळ येथील कार्यकर्ते काशिनाथ पाटील यांच्याशी बुथ प्रमुख व इतर पदाधिकारी नियुक्ती करण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली.