कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
लोकसभा महाविजय 2024 अभियानास करणार सुरुवात
मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्याच्या न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ व नवीन इमारतीचे कोनशीला समारंभाकरिता मंडणगड येथे येणारे उपमुख्यमंत्री व विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस 8 ऑक्टोंबर 2023 रोजी न्यायालयाचे कार्यक्रमानंतर भाजपच्या भिंगळोली कल्पना निवास येथील कार्यालयास सदिच्छा भेट देणार असल्याची माहीती तालुका अध्यक्ष अप्पासाहेब मोरे यांनी दिली आहे.
यावेळी श्री. फडणवीस लोकसभा महाविजय 2024 अभियानांर्तगत तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे व या कार्यक्रमास कोकण प्रभारी रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यासह जिल्हा व दापोली मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती लावणार असल्याचे पार्टीचेवतीने स्पष्ट करण्यात आले आहे. य्क भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.