
करुळ ग्रामपंचायतीचा पुढाकार
वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यात लम्पी आजारात वाढ होत आहे. पाळीव जनावरांना लम्पीची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत करूळ च्या वतीने शेतकऱ्यांच्या गोठ्यात औषध फवारणी करण्यात आली.
तालुक्यात यापूर्वी लम्पी आजाराने जनावरे दगावण्याच्या घटना घडल्या. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून करूळ मधील शेतकऱ्यांच्या गोठ्यात औषध फवारणी करण्यात आली. गावात म्हैशी व गाईंची संख्या मोठी आहे. दुधाचे उत्पादन ही चांगले आहे. जनावरांना आजार होऊ नये यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. शेतकऱ्यांच्या गोठ्यात व गोठ्याच्या भिंतीवर ही फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, उपसरपंच सचिन कोलते, शेतकरी सिद्धेश कोलते, प्रथमेश कोलते, प्रथमेश पाटील, संकेत पाटील, संदेश शिवगण, ग्रामसेवक शशिकांत गुरव आदी उपस्थित होते. या मोहिमेत प्रथमेश पाटील व संकेत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.












