वेंगुर्ल्यातील वाहतुक पोलिसांचा सत्कार

वेंगुर्ला | प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या काळात उत्तमरित्या आपले कर्तव्य पार पाडणा-या वेंगुर्ला पोलिस स्थानकाच्या वाहतुक पोलिसांचा वेंगुर्ला तालुका युथ संस्था व लोकराज्य मंच यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव, युथ संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीनिवास गावडे, लोकराज्य मंच सचिव निहाल शेख यांच्यासह मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. या सत्काराबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.