मंडणगड l प्रतिनिधी : लोकशाहीचे दोन महत्वाचे खांब असलेली न्यायपालिका व शासन यांनी एकत्रीपणे काम करत राज्य घटनेस अभिप्रेत तत्वांचे आधारे देशाचे व राज्याचा विकास होत असल्याचे तसेच गतीमान निर्णयामुळे दोन महिन्याचे कालावधीत मंडणगड तालुक्याचे न्यायालय मंजुर झालेले असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह, विधी व न्यायमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मंडणगड येथे केले. 8 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा न्यायालय रत्नागिरी यांच्यामार्गदर्शनाखाली दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन व न्यायालयाचे नविन इमारतीचा कोनशीला समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमीत्ताने आयोजीत स्वागत सत्कार समारंभास श्री. फडणवीस यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव असलेल्या तालुक्यात न्यायालय सुरु करण्याचे कार्यक्रमास उपस्थिती लावता आली ही भाग्याची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये लोकशाहीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत व संविधानामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही अधिक समृध्द होत आहे संविधानाच्या तत्वाना आधार मानुन देश प्रगती करत आहे मंडणगड येथील न्यायालयाचे इमारतीचे काम वेळेत पुर्ण होईल न्यायपालिकेवर सर्वसामान्यांच्या विश्वास आजही कायम टिकून आहे. त्यामुळे लोकशाही टिकून आहे.
न्यायालयासमोर मोठ आव्हान आले ते प्रलंबीत खटल्यांचे 11630 दिवाणी तर 28130 गुन्हेगारी स्वरुपाचे खटले प्रलंबीत आहेत यातील बरचेस दावे तीस वर्षाहुन अधिक काळ प्रलंबीत आहेत. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन न्यायपालिका गतीमान होत आहे. महाराष्ट्र गोवा बार कौन्सीलने इ फाईलींगचा देशास आदर्शवत असा उपक्रम अंगीकारला आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष संहिता हे नवे प्रयोग होत आहे यातुन न्याय पालिका अधिक गतिमान कऱण्याचा प्रयत्न आहे शासन व न्यायपालिका यांनी एकत्र काम केल्यास जलद प्रक्रीया गतिमान होईल. न्यायपालिका गतिमान करण्यासाठी राज्यशासनाने पायाभुत सुविधा व विविध बांबीसाठी आठशे कोटी रुपयांचे निधीची तरतूद केली आहे. चिफ जस्टीस व मुख्यमंत्री यांच्या संयुक्त सभेचे निर्णय वेगाने राबवण्याचा प्रयत्न राज्यात केला जात आहे. आंबडवे येथे बाबासाहेबांच्या उंचीस साजेसे जीवंत स्मारक उभे करण्यासाठी व्यवस्था लावण्याचे त्यांनी यावेळी अश्वासीत केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमुर्ती माधव जामदार यांनी भुषविले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमुर्ती श्री. भुषण गवई, उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमुर्ती देवंद्रकुमार उपाध्याय, रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायाधीश विनायक जोशी, मंडणगडचे न्यायमुर्ती एम.ए. शिंदे, पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. संपदा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी कऱण्यासाठी मंडणगड वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. मिलींद लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व वकीलांनी मेहनत घेतली.