आबलोली(वार्ताहर) आयुष्यमान भव या कार्यक्रमांतर्गत खोडदे सर्व महसूल गावाच्या सगळ्या किशोरवईन मुलींचा व गावातील महिलांचा हिमोग्लोबीन तपासणनी कॅम्प गुहागर तालुक्यातील खोडदे अंगणवाडी येथे ग्रामपंचायत उपसरपंच कुमारी पूजा गुरव यांच्या अध्यक्षखाली घेण्यात आला. ग्रामपंचायत ग्रामीण पाणी पुरवठा आरोग्य व स्वच्छता पोषण कमिटीच्या संयोगाने अंगणवाडी सेविका, आशा गटप्रवर्तक यांच्या सहकार्यातून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला हार उपसरपंच पूजा गुरव, श्री.राजेंद्र साळवी, श्री.विलास गुरव यांनी अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
अंगणवाडी व आशा यांनी सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले तसेच गावामध्ये स्वच्छतेची प्रभात फेरी काढण्यात आली व स्वच्छतेच्या घोषणा देण्यात आल्या त्यावेळी उपस्थित मान्यवर उपसरपंच कुमारी पूजा गुरव ,संत गाडगेबाबा अध्यक्ष श्री राजेंद्र साळवी, उपाध्यक्ष श्री विलास गुरव, सदस्य सौ. शुभांगी डिंगणकर, गटप्रवर्तक श्रीमती. स्वाती साळवी आशा सौ.रेशमी साळवी, सौ. माधोरा साळवी, सौ. पूजा निवाते, श्रीमती. संपदा कदम, अंगणवाडी सेविका सौ. श्वेता गुरव, सौ. जयश्री साळवी, सौ.अक्षता मोहिते, श्रीमती. स्नेहा आंब्रे, सौ. ज्योती निर्मळ, मदतनीस प्राची साळवी, सौ. नम्रता मोहिते, सर्व अंगणवाडी विद्यार्थी व गावातील किशोरवयीन मुली,व ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी मुलींची हिमोग्लोबीन तपासणीचा २० विद्यार्थीनींनी लाभ घेतला. निर्मळ ग्रामपंचायत खोडदे व कमिटीचे आभार मानले.












