
आचरा | अर्जुन बापर्डेकर : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे देवस्थानच्या गणपतीचेविसर्जन सोमवारी सायंकाळी भावपूर्ण वातावरणात आचरा पिरावाडी येथील समुद्रात करण्यात आले. आणि एकविस दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली. एकवीस दिवस चाललेल्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन समितीतर्फे करण्यात आले होते. यात तोंडपाठ आरती स्पर्धा ,दशावतार, फुगडी स्पर्धा,डबलबारी भजनाचा सामना,नारळलढत स्पर्धा रेकॉर्ड डान्स स्पर्धा आदी कार्यक्रमांची रेलचेल होती.सोमवारी दुपारी गणपती विसर्जन मिरवणूक रामेश्वर मंदिर येथून पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात आचरा तिठा,बाजारपेठ मार्गे नेत सायंकाळी पिरावाडी येथे नेण्यात आली. ठिक ठिकाणी भाविकांनी रांगोळी काढून, फुलांचा वर्षाव करत गणरायाचे स्वागत केले.नाडण यथीलढोल पथकाने या मिरवणूकीत रंगत आणली होती. सायंकाळी मावळत्या सुर्याच्या साक्षीने गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषात पिरावाडी
येथील समुद्रात श्रींचेविसर्जन करण्यात आले. गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूकीत भाविकांनी अलोट गर्दी केली होती.












