भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित
वैभववाडी l प्रतिनिधी : कोकण विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी अभियान सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची संयुक्त बैठक येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपा जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे, भाजपा पदाधिकारी सज्जनकाका रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, माजी सभापती भालचंद्र साठे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, सुधीर नकाशे, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, महेश संसारे, राजेंद्र राणे, तालुका उपाध्यक्ष अनंत पवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संकेत सावंत, अक्षय पंडित व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यात पदवीधर शिक्षण घेणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. गाव निहाय पदवीधर युवकांची यादी प्रत्येक पदाधिकारी यांच्या कडे असली पाहिजे. मतदानापासून एकही पदवीधर वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. 2020 पूर्वी पदवी पूर्ण झालेल्या प्रत्येक पदवीधराला मतदान करण्याचा हक्क आहे. नोंदणीला उशीर न करता त्वरित नोंदणी सुरू करावी असे आवाहन प्रमोद रावराणे यांनी केले. भालचंद्र साठे, सज्जनकाका रावराणे, संजय सावंत यांनी मार्गदर्शन केले.












