वैभववाडी | प्रतिनिधी
खांबाळे मोहितेवाडी येथील मोहन शंकर मोहिते वय 80 हे वयोवृद्ध इसम बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झाल्याची तक्रार मुलगा भगवान मोहिते यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
मोहन मोहिते हे 4 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाले आहेत. नातेवाईकांनी त्यांची शोधा शोध केली. परंतु ते सापडले नाहीत. मंगळवारी वैभववाडी पोलीस ठाण्यात मुलगा भगवान मोहिते यांनी तक्रार दाखल केली आहे. वैभववाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.