मुंबई
मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. बीडीडी चाळींच्या कामांना गती देताना बांधकाम क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वरळी, नायगाव आणि ना.म.जोशी मार्ग इथं एकूण १५९ बीडीडी चाळी आहेत. यापैकी काही चाळींचा विकास पहिल्या टप्प्यात केला जाणार आहे. या पुनर्विकासात रहिवाश्यांना विविध सोयी मिळणार आहेत. चाळ परिसरातल्या पात्र निवासी झोपडपट्टीधारकांना संक्रमण शिबिराऐवजी त्यांनी मागणी केल्यास दरमहा भाडं देण्याच्या पर्यायालाही यावेळी मंजुरी देण्यात आली.
Home ताज्या घडामोडी मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आढावा...