कणकवली मतदारसंघात विकास निधी चा ओघ सुरूच
जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहे समाधान
कणकवली (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ग्रामीण भागातील व ग्रामीण मार्गांवरील पूल बांधणेच्या नाबार्ड योजनेच्या २९ कार्यक्रमाला मंजूरी दिली आहे. सदर मंजूर कामांमध्ये आमदार नितेश राणे यांच्या शिफारस पत्रानुसार मतदारसंघातील १) बिडवाडी पिसेकामते रस्ता इ. जि.मा. २९ ता. कणकवली येथे कॉजवेच्या ठिकाणी पूल बांधणे. रू. १ कोटी ७० लाख व २) जांभवडे बौद्धवाडी रस्ता ग्रा. मा. १७ ता. वैभववाडी येथे पूल बांधणे. रू.१ कोटी ८० लाख अशा एकूण ३ कोटी ५० लाख रूपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
या कामांमुळे तेथील ग्रामस्थांची बारमाही वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. म्हणून ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण व कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.











