भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना गुवाहाटीमध्ये खेळला जाणार

भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्या गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे. दुसरा सामना १२ जानेवारीला कोलकात्यात तर तिसरा १५ तारखेला तिरुवनंतपूरम इथं खेळला जाणार आहे. या सामन्यांसाठी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे असणार आहे. याआधी भारतानं जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली होती. श्रीलंकेविरूद्धच्या आगामी ३ एकदिवसीय मालिकेमध्ये भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे खेळू शकणार नाही, गुवाहाटी इथं होणाऱ्या आगामी सामन्यासाठी बुमराहला संघात सहभागी करण्यात आलं होतं, पण त्याला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी आणखी वेळ देण्यासाठी, त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.