सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार समाज मंडळाच्या उपाध्यक्षपदी रितेश सुतार यांची निवड

Google search engine
Google search engine

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वैभववाडी तालुक्यातील लोरे गावचे सामाजिक कार्यकर्ते रितेश सुतार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर वैभववाडी तालुक्यात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. मंडळाच्या झाराप येथील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. रितेश सुतार यांचे संघटना बांधणीत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. श्री. सुतार लोरे ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत आहेत. ते तालुका भाजपचे प्रमुख पदाधिकारी असून लोरे गावच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. वैभववाडी तालुक्यात ते उत्कृष्ट भजनी बुवा म्हणून परिचित आहेत. या कार्यकारणीमधे वैभववाडी तालूक्याला ऐवढ्या मोठ्या पदावर प्रथमच संधी देण्यात आली आहे. निवडीनंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.