कणकवली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत, न्यू इंग्लिश स्कूल,फोंडाघाट प्रशालेचे घवघवीत यश !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी :       कला, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग. आयोजित कणकवली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा कासार्डे ता.कणकवली येथे संपन्न झाल्या. या मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट प्रशालेतील १४ वर्ष मुली वयोगटात (६०० मीटर धावणे)

कु. सानिका संदीप जाधव ( द्वितीय क्रमांक)

१७ वर्षे वयोगटात ( १५०० मीटर धावणे)

१) कु. स्वस्ती विजय पाटील (प्रथम क्रमांक)

२) कु. वैष्णवी दशरथ जोईल ( द्वितीय क्रमांक)

१९ वर्षे वयोगटात मुले.

लांब उडी

१) आर्यन सोमा कदम ( प्रथम क्रमांक )

गोळाफेक

१) जॉली बावतीस फर्नांडिस (प्रथम क्रमांक)

वरील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. तसेच जिल्हास्तरीय होणाऱ्या मैदानी स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे फोंडाघाट एज्यु. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच जिल्हास्तरावर होणाऱ्या मैदानी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.