कट्टा येथील वेशभूषा स्पर्धेस चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

 

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने आयोजित वेशभूषा स्पर्धेस शालेय विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा ३ गटात घेण्यात आली. ७५ पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला. जीजामाता, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ, वर्तमान पत्र, सिगारेट, चांद्रयान, शिक्षीका, अंधश्रध्देची बाहुली, शेतकरी, वैदिका आदी विविध प्रकारच्या वेशभूषा विद्यार्थ्यानी साकार केल्या.या स्पर्धेचे परीक्षण विवेक नेवाळकर व वैष्णवी लाड यांनी केले. सुजाता पावसकर व श्रीधर गोंधळी यानी व्यवस्थापन केले.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. अंगणवाडी गट: प्रथम क्रमांक किमया संदीप सावंत, क्रीशा किरण परब

द्वितीय क्रमांक काव्या गौरव नागले, मयंक पराग महाभोज.

तृतीय स्पृहा संतोष गिरकर.उत्तेजनार्थ

अनन्या ऋदयनाथ चव्हाण, खुशी रूपेश पडते.

पहिली ते दुसरी गट:

प्रथम भावेष संदीप सावंत (कुणकवळे), द्वितीय

आर्य गणेश जाधाव, मदन प्रीतम चव्हाण (काळसे)

तृतीय मैथीली रुपेश परब पेंडुर, उत्तेजनार्थ स्वराधा संदीप चव्हाण (सुकळवाड), सुकन्या विकास वराडकर,कुंजल विराज वाळके, दिपराज दीपक जाधव,रुद्रा युवराज ढोलम, विघ्नेश परिट,अवंतिका सावंत.

तिसरी ते चौथी गट: प्रथम क्रमांक सुजल राजेंद्र धारपवार, प्रांजल सुनिल गावडे. द्वितीय सान्वी देवेंद्र कदम, श्रेया धनाशाम परब, तृतीय

अथर्व चंद्रशेखर वराडकर वैष्णवी श्रीराम चिंदरकर, उत्तेजनार्थ देविका संदीप नांदोसकर,जयदीप दीपक सोनवडेकर,सिद्धि दशरथ गुराम, निधी प्रदीप वराडकर, स्वरा गिरिष आळवे, साईराज शंभु परुळेकर, श्रेया शंकर माने आदीनि यश प्राप्त केले.

यावेळी बापू तळावडेकर, दिपक भोगटे, सायली चव्हाण, प्रियांका भोगटे, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.