लांजा (प्रतिनिधी ) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजा मार्फत १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत श्री दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजा मार्फत घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात येते. यावर्षीही लांजा शहरातील विविध भागातून ही दौड निघणार आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी, कटिबद्ध असणारी शिवशंभु रक्तगटाची आणि राष्ट्रभक्तांची अवघी तरुण पिढी घरोघरी उत्पन्न व्हावी .देव, देश आणि धर्मरक्षणाच्या ,राष्ट्राच्या, संस्कृतीच्या, सत्व स्वाभिमानाच्या संदर्भात निद्रिस्त होत चाललेल्या हिंदू समाजाने खडबडून जागे व्हावे यासाठी केलेला अट्टहास म्हणजेच ‘श्री दुर्गामाता दौड’ आहे.
घटस्थापना ते विजयादशमी म्हणजेच १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत प्रतिदिन सकाळी सहा वाजता लांजा शहरातील’ महात्मा बसवेश्वर चौक’ येथून या श्री दुर्गा माता दौडला प्रारंभ होणार आहे. अधिक माहितीसाठी बजरंग दलाचे श्री प्रल्हाद साळुंखे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











