सावंतवाडी । प्रतिनिधी : विज्ञानाची सकारात्मक बाजू आपण समजून घेऊन विज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात आपण वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाच्या सुंदर आणि भव्यदिव्य आयोजनाबद्दल यावेळी त्यांनी शाळा व्यवस्थापन, चेअरमन रा.रे.बिशप आल्विन बरेटो, प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदान्हा, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले तसेच आभार मानले. सावंतवाडी तालुकास्तरीय ५० व्या विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण आणि समारोपाचा कार्यक्रम १० जानेवारीला मिलाग्रीस प्रशालेच्या भव्य सभागृहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे,उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, सावंतवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्रप्रमुख श्रीम.स्नेहा लंगवे, मिलाग्रीस हायस्कूल आणि ज्युनि.काँलेजचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका श्रीम.मेघना राऊळ, इतर केंद्रांचे केंद्रप्रमुख,गटसाधन केंद्राचे कर्मचारी,परीक्षक,मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक उपस्थित होते. श्री.अरूण सुतार, श्रीम.कल्पना बोडके,फादर रिचर्ड सालदान्हा यांनी आपली मनोगते सादर केली. जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा.श्री.धोत्रे यांचे स्वागत सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मा.श्रीम.कल्पना बोडके यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विज्ञान प्रतिकती,अध्यापक निर्मित शै.साहित्य, प्रयोगशाळा परिचर-सहाय्यक प्रतिकती,निबंध स्पर्धा, वक्तत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्रशालेने नेमलेले स्वयंसेवक-विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रशालेच्या सह.शिक्षिका श्रीम.शारदा गावडे यांनी तर सह.शिक्षक श्री.दत्ताराम नाईक यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.










