भोस्ते घाटात ट्रकच्या धडकेत २६ वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू

खेड(प्रतिनिधी)मुंबई गोवा महामार्गा वरील भोस्ते घाटात ट्रकच्या धडकेत २६ वर्षीय तरुण दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली हा अपघात सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घाटातील अवघड वळणावर घडला

शुभम सुदाम काणेकर रा मोरवंडे सुतारवाडी असे त्या मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे यातील दुचाकी स्वार शुभम काणेकर हा आपल्या ताब्यातील दुचाकीने मोरवंडे येथे जात असताना भोस्ते घाटा च्या अवघड वळणावर पुढे असलेल्या ट्रक ची धडक दुचाकीला बसल्याने दुचाकी स्वार काणेकर हा गंभीर जखमी झाला होता त्याला तात्काळ भरणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्याच्या वर उपचार सुरू असताना सांयकाळी त्याची प्राणज्योत मालवली

मोरवंडे गावचे ग्रामस्थ श्री.सुदाम काणेकर याचे द्वितीय पुत्र . शुभम सुदाम काणेकर, हा , अतिशय कमी कालावधीत आपल्या इंटेरियर डिझाईन च्या कामा मुळे संपूर्ण तालुक्यातील बिल्डर लोकांना आकर्षित केलेला, अतिशय मेहनत व जिद्दीच्या जोरावर आपल्या कुटूंबाची गरिबीची परिस्थिती दूर करण्यासाठी झटत होता

दरम्यान या घटनेनंतर अपघात ग्रस्त ट्रक येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम हाती घेण्यात आले होते