सावंतवाडी । प्रतिनिधी :
मळगांव रेडकरवाडी येथील रहिवासी श्रीमती सत्यभामा भिकाजी रेडकर यांचे मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन विवाहीत मूली, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. नेमळे विभागाचे वनरक्षक रामचंद्र उर्फ बबन रेडकर यांची ती आई तर मळगांव ( वेत्ये ) रास्त धान्य दुकानाचे वितरक अनिकेत रेडकर तसेच सावंतवाडीतील ज्ञानसिंधु प्रबोधिनीचे संचालक राजेश्वर उर्फ राजू रेडकर यांची ती आजी होत.
Sindhudurg











